Tuesday 30 December 2014

Shubhaste Santu Panthanah!

माझे गाणे माझे खाणे……… 

!!शुभास्ते सन्तु पन्थान!!

वेगवेगळ्या विचारांचे चक्र प्रत्येकाच्या मनात फिरत असतं. आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर येणारे अनुभव कधी सुखावणारे असतात तर कधी सतावणारे. नाही म्हंटल म्हणून विचारांचं हे चक्र थांबत नाही. त्याच रिमोट कंट्रोल आपल्या हातात कधी नसतोच मूळात. एक सतत वाहणारा प्रवाह असतात हे विचार.  काळ, वेळ, प्रसंग, व्यक्ती आणि नियती जणू मिळून ह्या विचारांची जडण घडण करत असतात. ह्या प्रवाहात मन सुद्धा वाहत असतं. 

माझ्या जीवन प्रवासात असेच अनुभव मलाही येतात. मग एक विचारांचं चक्र माझ्याही मनात सुरु होत. विचारांच्या  ह्या हिंदोळ्यावर बसून माझं  मन खूप उंच उंच झोके घेत आणि नवीन अनुभव सोबत घेऊन पुन्हा माझ्याजवळ येत…. तेव्हा मला काय वाटत ……… हे सांगण्याचा एक खराखुरा प्रयत्न. 

जसा प्रत्येक गाणारा कवी नसतो तसाच प्रत्येक लिहिणारा लेखक किवा कवी नसतो. मला लिहायला आवडतं. ह्या आधीच्या वाक्यात माझी लिहिण्याची भूमिका मी स्पष्ट केली आहे. त्यावर वेगळी चर्चा नको एवढी माफक अपेक्षा. जस लिहायला आवडत तसच खायला सुद्धा आवडतं. आणि म्हणून माझ्या ह्या ब्लॉगच बारसं  करायाच ठरवलं तेव्हा पटकन जे नाव सुचलं ते … "माझे गाणे माझे खाणे". 

ब्लॉग सुरु करावा ह्याची कल्पना आणि प्रोत्साहन देणारा माझा सगळ्यात जवळचा मित्र समितीन ब्रीद ह्याचा उल्लेख केल्याशिवाय श्रीगणेशा होणार नाही. नावासाठीही त्याचाच दुजोरा मिळाला. 

विचार करणं, मनाच गुंतन किवां  जीवन जगण … हे सगळ एक प्रवास नाहीतर आणखी काय आहे. एक अखंड प्रवास. थकलो तरीही न थांबणारा. माझा हा ब्लोग सुद्धा एक प्रवास असणार आहे तुमच्यासोबत करण्याचा. म्हणूनच तुम्हाला आणि मलासुद्धा ह्या प्रवासासाठी शुभास्ते सन्तु पन्थान…… 






 

1 comment: